प्रशासनाची बघ्याची भूमिका
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत चारफाटा भागातील रस्त्यावर असलेली अतिक्रमणे काढून टाकण्यात यावीत यासाठी उपोषण करण्यात आली होती. नारीशक्ती संघटनेच्या आंदोलनांनंतर चार फाट्यावरील शासकीय जागेवर अनधिकृत अतिक्रमण केलेले बांधकाम हटविले होते. मात्र, नव्याने रस्ता तयार झाल्यानंतर रस्त्याच्याकडेला असलेल्या मोकळ्या जागेवर नव्याने अनधिकृत बांधकाम होऊ लागली आहेत. यामुळे पुन्हा समस्या उद्भवणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी देखील अशी समस्या उद्भवली होती सार्वजनिक बांधकाम विभाग व दुसरीकडे नगरपरिषद जबाबदारी झटकत होती. बांधकाम तोडल्यानंतर पुन्हा सहा सात महिन्यांनी याच ठिकाणी बांधकाम होण्यास सुरुवात झाली तेव्हा देखील वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून ते बांधकाम पोलीस बंदोबस्त घेऊन पुन्हा तोडले होतेे. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यास पुन्हा त्याच ठिकाणी हळूहळू अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने कदाचित या काळात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होऊ शकतात, त्यामुळे नरी शक्ती संघटनेने आक्रमण भूमिका घेतली आहे.
चारफाटा ते बिकानेर रस्ता जर नगरपरिषदेने केला आहे. तेथील अनधिकृत बांधकामे नगर परिषदेने हटवावी ती आमची हद्द येत नाही.
संजीव वानखेडे,
उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
जर सार्वजनिक बांधकाम विभागाची जमीन आमच्या हद्दीमध्ये येत असेल तर तसे नगरपरिषदेला पत्र द्यावे, आम्ही त्वरित होणार्या अतिक्रमणावर कारवाई करू.
वैभव गारवे,
मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद







