। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
खरिवली येथील ग्रामस्थ आणी वारकरी एकत्र येत विठ्ठल रखुमाई मंदिरात गेली 49 वर्ष अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यावेळी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, संपूर्ण सप्ताहाचे व्यासपीठ ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले. गेले सात दिवस अखंड भजन, किर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी चैतन्य निर्माण झाले. दीपोत्सव दिवशी गावातून पायी पाळखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, काल्यांचे किर्तन रामदास पाटील यांनी केले.