| वाघ्रण | वार्ताहर |
वाघ्रण येथील प्रबोधन सामाजिक सेवा संस्थेचा जिल्हा कार्यालय प्रवेश कार्यक्रम अलिबाग येथे आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने गणेश पूजन करण्यात आले. सुभाष जोशी यांनी याचे पौरोहित्य केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष अॅड. गणेश पाटील, उपाध्यक्ष डॉ.मिलींद पाटील, सचिव दीपक पाटील, सहसचिव सचिन पाटील, सदस्या मनिषा पाटील आणि आरती पाटील उपस्थित होते नोंदणीकृत या संस्थेचे अनेक सभासद देखील हजर होते.
यावेळी डॉ.मिलिंद पाटील यांनी गेल्या चार वर्षात झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला तर अध्यक्षानी लवकरच आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करीत आहोत असे जाहीर केले. दीपक पाटील यांनी नवीन उपक्रमाला जास्त प्रतिसाद मिळावा यासाठी जाहिरात होणे गरजेचे आहे असे सांगून काती कल्पना सुचविल्या अलिबाग बस स्थानकासमोरील प्रभाशंकर इमारतीत पहील्या मजल्यावर हे कार्यालय असल्याने विद्याथी किंवा स्पर्धकांना जवळचे स्थान असल्याचे काही सभासदांनी सुचित केले. कार्यक्रमाला अॅड जयंत धोदरे, प्रशांत वाघमारे, अंनत पाटील,समाधान पाटील, वीणा धोदरे यांच्यासह नर्सिंग व ब्युटी पार्लर विद्यार्थीनी हजर होत्या