। नवीन पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकावर कारवाई करत त्याला अटक केली आहे. सफायत सत्तर मोहम्मद शेख (34) असे त्याचे नाव आहे. पनवेलमधील कळंबोली गाव येथे बांगलादेशी नागरिक ये-जा करत असल्याची माहिती कळंबोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सफायत सत्तर मोहम्मद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने बांगलादेशातील गरिबीला आणि उपासमरीला कंटाळून पोट भरण्यासाठी भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याचे सांगितले. तसेच, त्याच्याकडून मोबाईलदेखील जप्त करण्यात आला आहे.