| मुरूड | वार्ताहर |
मुरुड भंडारवाडा भंडारी समाज यांच्या वतीने भंडारी समाजाच्या श्री काळभैरव मंदिरामध्ये अश्वारुढ मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. दर्शनासाठी भाविकांची मंदिरामध्ये गर्दी होत आहे. कोविड काळापासून दोन वर्ष लॉकडाऊन मध्ये मंदिर बंद होते. त्यामुळे ही परंपरा खंडित झाली होती. आता तसे काही निर्बंध नसल्याने पुन्हा मोठ्या उत्साहात भंडारी समाजाच्यावतीने विधीवत पूजाअर्चा करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शेकडो भंडारी समाज बांधवांची उपस्थित होती