चिंतन शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

| अलिबाग | प्रतिनिधी |

भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा, उत्तर विभागाच्या माध्यमातून चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रायगड जिल्ह्यातून जिल्हा, तालुका ग्राम शाखा, विभाग शाखा, शहर शाखा पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक ,शिक्षिका, बौध्दाचार्य, श्रामणेर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

रसायनीमधील एचओसी कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये रविवारी दि.9 जूलै रोजी झालेल्या चिंतन शिबिरामध्ये भारतीय बौध्द महासभेची आचारसंहिता, धम्म क्रांती गतीमान कशी करावी, अशा अनेक विषयांवर राज्याचे सरचिटणीस सुशील वाघमारे, केंद्रीय सदस्या सुनंदा वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. चिंतन शिबिरानिमित्त सभासद नोंदणी अभियानाचे उद्घाटन राज्याचे सरचिटणीस सुशील वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी विजय कांबळे, उषा कांबळे, राजेश भालेवराव, संतोष जाधव, बंडू कदम, कमल कांबळे, मनिषा कांबळे, त्रिशीला सावळे, अनंत गायकवाड, रमा गांगुर्डे, दिपक कांबळे आदी पदाधिकारी, तालुका, ग्रामशाखा, विभाग शाखा, शहर शाखा, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौध्दाचार्य श्रामणेर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय कांबळे यांनी केले.

Exit mobile version