पाली येथे महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण

। रायगड । वार्ताहर ।

भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) व टाटा कम्युनिकेशन्स मुंबई यांच्याद्वारा आयोजित सुधागड पाली येथे अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिला व दिव्यांग व्यक्तीसाठी निशुल्क महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे सोमवारी दि. 21 ऑक्टोबर 2024 रोजी सुधागड येथे आयोजन करण्यात आले आहे.

टाटा कम्युनिकेशन्सच्या सामाजिक दायित्व विभागाअंतर्गत पुरस्कृत हा प्रशिक्षण कार्यक्रम असून यामध्ये उद्योग संधी व निवड, बाजारपेठ सर्वेक्षण, विपनण व्यवस्था, व्यवसायाचे व्यवस्थापन, सिध्दी प्रेरणा, क्षेत्र भेट, शासकीय कर्ज योजनांची माहिती, उद्योगासाठी लागणारे विविध परवाने, संवाद कौशल्य, उद्योगाची हिशोब पध्दती इत्यादी विषयावर तज्ञ प्रशिक्षकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल.

हे प्रशिक्षण निशुल्क स्वरुपाचे असून सुधागड-पाली तालुक्यातील महिलांसाठी ही संधी निर्माण झाली आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी शिक्षण 7 वी पास ते पुढे, वय 18 वर्षे पूर्ण 45 वर्षापर्यंत असावे. तसेच प्रशिक्षणामध्ये नियमित हजर राहण्याची तयारी असावी. प्रशिक्षण प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, 1 फोटो इत्यादी कागदपत्राची झेरॉक्स प्रत जोडावी. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.

प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी व प्रवेश अर्जासाठी शशिकांत दनोरीकर प्रकल्प अधिकारी, भारतीय उद्योजकता विकास संस्था, अलिबाग जि.रायगड भ्रमणध्वनी क्र. 7775802497 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन भारतीय उद्योजकता विकास संस्थेद्वारा करण्यात येत आहे.

Exit mobile version