पर्यावरण पूरक मखर निर्मिती

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यात गणेशभक्तांकडून पर्यावरण पूरक मखर बनवून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तालुक्यातच मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कशेळे येथे शेळके कुटुंबीय नातेवाईक यांच्या मदतीने पर्यावरण पूरक मखर विक्रीसाठी सज्ज आहेत. दरम्यान, मुरबाड, कर्जत, चौक आणि नेरळ येथे या पर्यावरण पूरक मखर उपलब्ध आहेत.

थर्माकोलचे विघटन होत नसल्याने पर्यावरण पूरक सजावट करण्याचा प्रयत्न गणेश भक्त करू लागले आहेत. इको फ्रेंडली धर्तीवर कशेळे गावातील तरुण रोहिदास शेळके यांच्याकडून बांबूच्या पाती आणि काठ्यांपासून मखर बनविलले जात आहेत. सहा वर्षांपूर्वी थर्माकोलवर बंदी आणल्यानंतर रोहिदास शेळके हे त्यांचे नातेवाईक यांच्याकडे बांबूच्या वस्तूंची गणेश सजावट करण्यास आले होते. तेथे बनविलेली सजावट बघून ते कुटुंब एकत्र येत पर्यावरण पूरक गणेश सजावटी असलेली मखर बनविण्यास सुरुवात केली.

शेळके चार महिने मखर बनविण्याचे काम करीत असून आतापर्यंत तब्बल 150 मखर तयार आहेत. मखर बनविण्यासाठी त्यांचे पाच नातेवाईक कशेळे येथे येऊन मदत करीत आहेत. गेली पाच वर्षे कमी पासून सुरुवात केलेली पर्यावरण पूरक मखर यांची शृंखला आता 150 च्या आसपास पोहचली आहे. नेरळ, कर्जत, कशेळे, चौक आणि मुरबाड या पाच ठिकाणी शेळके कुटुंबीयांनी बनविलेल्या इको फ्रेंडली मखर विक्रीसाठी सज्ज आहेत. त्यात षटकोनी मखर, कोपरा मखर, मंदिरे, अष्टविनायक मंदिर, सिंहासन मखर आणि गेट मखर अशा अनेक प्रकारच्या मखर बनविल्या आहेत. त्यात डिड फुटपासून साहा फूट आकाराच्या मखर आणि त्या देखील पर्यावरण पूरक असल्याने गणेश भक्त हे त्यांच्या मखरांकडे आकर्षित झाले आहेत. बांबूच्या पाती, बांबूची चटई, बांबूच्या काठ्या, रंगीत कापड, रंगीबेरंगी लेस, डायमंड या वस्तू या पर्यावरण पूरक मखर सजविण्यासाठी रोहिदास शेळके वापरत आहेत.

Exit mobile version