। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
रोहा शहरातील धाटाव औद्योगिक परिसरातील डीआरटी अंथिया अरोमा केमिकल्स कंपनीमध्ये कामगार क्षेत्रात कामगारांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ या युनियनची स्थापना शनिवारी (दि.1) करण्यात आली. प्रथम कंपनीच्या दोन्ही गेटवर युनियनच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर आर.आय.सी हॉल येथे सभा घेण्यात आली. धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत युनिट 1 आणि 2 या युनिटमध्ये युनियनच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ अध्यक्ष राजन राजे, महेशसिंग ठाकूर, समीर चव्हाण, अजित सावंत, नरेंद्र पंडित, सिद्धेश सावंत, नितीन उगले, प्रमोद जंगम, निखिल वरणकर, मयूर कोंडे, रामदास साखिळकर आणि विनोद मगर त्याचबरोबर कंपनीतील तथा धाटाव औद्योगिक परिसरातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.