एक्स बॉयफ्रेन्डने चिरला महिलेचा गळा

मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतल्या डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशनवर एका 23 वर्षीय तरुणाने एका महिलेचा गळा चिरला. या तरुणाला पोलिसांनी नवी मुंबई भागातून अटक केली आहे. वेळीच हा प्रकार मध्य रेल्वेच्या एका अधिकार्‍याच्या लक्षात आल्यामुळे त्याने महिलेचे प्राण वाचवले, मात्र तिची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रेल्वे स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.
घटनेनंतर अवघ्या 48 तासात 23 वर्षीय आरोपी मोहित आगळे याला सीबीडी बेलापूर भागातून अटक करण्यात आली. हल्ला झालेली 21 वर्षीय महिला विधवा असून तिला चार वर्षांची मुलगी आहे. महिलेचे इतर कोणासोबत अफेअर असल्याच्या संशयातून हा हल्ला केल्याची कबुली आरोपीने दिली असून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचंही त्यानं सांगितलं. पीडित महिलेची प्रकृती गंभीर आहे.

Exit mobile version