पीएनपी एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात

शिवज्योत घेऊन विद्यार्थ्यांची अलिबागमध्ये रॅली
। अलिबाग । वार्ताहर ।

पीएनपी एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय अलिबाग येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सकाळी 10 वाजता शिवज्योत घेऊन अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्‍वी संकुला पर्यंत रॅली काढण्यात आली होती. यावेळी कार्यक्रम स्थळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले.यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, पीएनपी संकुलाचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, पीएनपी कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्रा. नम्रता पाटील, मुख्याध्यापक निलेश मगर, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. तेजस म्हात्रे, प्रा. दिनेश पाटील, युवा नेत्या हर्षदा मयेकर, विनायक पाटील, आशिष बाणे, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Exit mobile version