दिवाळीच्या निमित्ताने ऑफरचा धमाका

ग्राहकांचाही उदंड प्रतिसाद
रेवदंडा । प्रतीक कोळी ।
दिवाळीच्या निमित्ताने अलिबागसह संपूर्ण रायगडातील बाजारपेठा सजल्या असून,ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खाण्याच्या पदार्थांपासून तयार कपडे. भेटवस्तु आदींवर व्यावसायिकांकडून ऑफरचा धमाकाच लावला आहे.त्यामुळे ग्राहकांची नजर अशा ऑफर्स वस्तु खरेदीकडे लागली आहे.
अलिबागमध्ये कपडे, भांडी तसेच दिवाळीसाठी आवश्यक असणारे सजावटीचे आणि वाणसामान यांच्यावर विविध ऑफर्स लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्राधान्याने अंकुर मार्ट, हेमंत मेंडन यांचे सुपर मार्केट, स्मार्ट रायगड बाजार, एनॉय ब्युटीक, रणुजा गारमेंट, नुपूर सारीज, श्रीपाल आर्टीक्टस यांचा समावेश आहे.
कपडयांसाठी भाऊबीज या सणाला मध्यवर्ती ठेऊन सवलती देण्यात आल्या आहेत. महिलांच्या कपड्यांसाठी 20 ते 30 टक्के सवलत देण्यात आली आहे. यामध्ये साडी, ड्रेस मटेरियल यांचा समावेश आहे.
याशिवाय फॅन्सी मटेरियल 199 पासून 799 पर्यंतच्या दरम्यान उपलब्ध करण्यात आले आहेत. भावांना खुष करण्यासाठी त्यांना कपडयांची भेट देण्यासाठीही अलिबागमधील एनॉय ब्युटीक, रणुजा गारमेंट इ. दुकाने 25 ऑक्टोबरपासून सज्ज झाली आहेत. उत्कृष्ट दर्जाचे पुरूषांचे कपडे सवलतीच्या दरात येथे उपलब्ध आहेत. सर्वच दुकानात टी-शर्टच्या किंमती 250 ते 399 तर शर्टच्या किंमती 199 ते 499च्या दरम्यान ठेवण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे पारंपारिक कपडयांमध्येही सवलत देण्यात आली असली तरी ती अधिकाधिक 20 टक्क्यांपर्यंत आकारण्यात आली आहे.
अंकुर मार्ट, सुपर मार्केट, स्मार्ट रायगड बाजार आदी शॉपिंग मॉलमध्ये फेस्टिवल ते बेस्टिवल पर्व सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विविध सवलती देण्यात आल्या असून सरासरी काढल्यास 20 ते 60 टक्क्यांपर्यंत सवलती आकारण्यात आल्या आहेत. फराळावर 30 टक्क्यांपर्यंत सवलती आकारण्यात आल्या असून फराळ बनविण्याच्या सामानावर 60 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. याशिवाय, बाय वन गेट वन फ्री, वस्तूच्या संचावर आकर्षक भेटवस्तू आदी ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ऑफर्स 25 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या असून त्या 6 नोव्हेंबर पर्यंतच म्हणजे भाउबीज या सणापर्यंत उपलब्ध असणार आहेत.

ऑनलाईन खरेदीची धडाक्यात
याशिवाय छोटेमोठे व्यापारी, लघुउद्योजक यांनीही त्यांच्या सोयानुसार विविध वस्तूंवर सवलती दिल्या आहेत. बदलत्या काळानुसार उपलब्ध असणार्‍या ई-कॉमर्स कंपन्यांनीही विविध ऑफर्स जाहीर केल्या असून यामध्ये अमेझॉन, फिल्पकार्ट आदी आघाडीवर आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन शॉपिंग हा पर्याय अर्थ आणि आरोग्य यांच्या दृष्टीने लाभकारक असून ग्राहकांची या पर्यायास अधिक पसंती असल्याचेही चित्र आढळत आहे.


दिवाळीच्या निमित्ताने फराळापासून ते फराळ बनविण्यासाठी आवश्यक असणार्‍या सामानांवर आम्ही सवलत देत आहोत. पण म्हणून सवलतीसह कोणतीच तरतूद आम्ही करत नाही. सवलतीचे पण उत्कृष्ट दर्जाचे गुणवत्तायुक्त सामान आणि ग्राहकांचे समाधान, हाच आमच्या दिवाळीचा खरा आनंद.
कांतीलाल कारणी, अंकुर मार्ट, अलिबाग

Exit mobile version