आरसीएफचे चेअरमन एस.सी. मुदगेरीकर यांच्या हस्ते लोकार्पण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या चोंढी येथील नेत्ररुग्णालयात नेत्रपटल (रेटिना) स्कॅन करणारे ओसीटी हे अत्याधुनिक उपकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलाझर्स लि. च्या सीएसआर फंडातून यासाठी अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या उपकरणाचे लोकार्पण मंगळवार, दि. 29 मार्च रोजी दुपारी आरसीएफचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर एस.सी. मुदगेरीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्यातर्फे चालविण्यात येणारे चोंढी येथील नेत्ररुग्णालय गेली सहा वर्षे नेत्र रुग्णांसाठी एक आशास्थान बनले आहे. लायन्स क्लब ऑफ अलिबाग, मांडवा, पोयनाड आणि चेंबूर डायमंड या क्लब्सनी एकत्र येऊन 2017 पासून हे रुग्णालय कार्यरत केले आहे. दिवसागणिक अत्याधुनिक उपकरणे आणून अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी हे रुग्णालय कटिबद्ध आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून नेत्रपटल (रेटिना) स्कॅन करणारे ओसीटी हे अत्याधुनिक उपकरण आता रुग्णालयात आणण्यात आले आहे. या रुग्णालयात उपलब्ध सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागचे चेअरमन लायन अनिल जाधव यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी मार्केटिंग डायरेक्टर श्री. ठाकचेन, एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर आर.आर. कुलकर्णी, एचआर एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर सुनीता शुक्ला, एचआर जनरल मॅनेजर एस.एम. कुलकर्णी, डेप्युटी जनरल मॅनेजर सीएसआर पराग दांडेकर, सीएसआर चीफ मॅनेजर धनंजय खामकर, सीएसआर सिनिअर मॅनेजर प्रमोद देशमुख आणि पीआरओ संतोष वझे यांच्यासह लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागतर्फे फाऊंडेशनचे विश्वस्त चेअरमन लायन अनिल जाधव, व्हाईस चेअरमन लायन नितीन अधिकारी, सचिव लायन प्रवीण सरनाईक, खजिनदार लायन अरविंद घरत, लायन अनिल म्हात्रे, लायन महेंद्र पाटील, लायन नयन कवळे, लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष लायन भगवान मालपाणी, लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष लायन मोहन पाटील, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष लायन प्रमोद पाटील, लायन्स क्लब अलिबाग डायमंडच्या अध्यक्षा लायन प्रीतम गांधी यांच्यासह या सर्व क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.