महाडमध्ये शेतकरी जनजागृती

महाड । प्रतिनिधी ।
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरित क्रांतीला चालना दिल्याने त्यांना हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात कृषी दिन साजरा केला जाते. त्याचे औचित्या साधून महाड तालुक्यात आणि शहरात विविध ठिकाणी कृषिदिन साजरा करण्यात आला. कृषी कार्यालय आणि आचलोळी येथील कृषी महाविद्याल आणि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने कृषी दिनानिमित्त शेतकरी जनजागृती आणि कृषी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाड तहसीलदार सुरेश काशीद, प्राचार्य वैभव गिरमोन्हेकर, कृषी अधिकारी महाड लक्ष्मण कोतवाल यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीलदार सुरेश काशीद यांनी कशेतकर्‍यांना बियाणे लागवड, बियाणे निवड, आणि शेतीविषयक मार्गदर्शन केले.

Exit mobile version