शेतकऱ्यांची बियाणे पेरणीला सुरुवात

| आगरदांडा | प्रतिनिधी।

मुरूड शहरांसह पंचक्रोशी भागांमध्ये खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून, शेतकरी शेतात बियाणे पेरणीचे काम सुरू करताना दिसत आहेत. पावसाचे आगमन जवळ आल्याने अनेक ठिकाणी शेतात मशागतीची कामे पूर्ण करून बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, मशागत आणि पेरणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुरूड कुंभार वाड्यातील शेतकरी प्रसाद विलास जळगावकर व प्रसन्न जाळगावकर यांनी आपल्या शेतात मशागतीची कामे पूर्ण करून भात पिकांसाठी बियाणे पेरणीची तयारी केली आहे. तालुक्यात 3300 हेक्टर भात लागवडीचं क्षेत्र असून, या क्षेत्रामध्ये शेतकरी सुवर्णा, जया, रूपाली, चिंटू, वाडा कोलम, रत्ना, शुभांगी, कर्जत व खारपट्ट्यात जमिनीवर पनवेल इत्यादी भाताच्या जातीची लागवड केली जाते.

Exit mobile version