अवयव विक्रीचे रेट कार्ड घेऊन शेतकरी थेट ‌‘मातोश्री’वर

उद्धव ठाकरेंनी केली कर्जमाफीची मागणी


| मुंबई | प्रतिनिधी|


राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. पीककर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्यांनी अवयव विकायला काढलेत. अवयव विक्रीचे रेट कार्ड जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारने कर्जाचे नियोजन करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. धनंजय मुंडेंनी कुठल्यातरी एका घरात बसावं आणि सांगावं मदत कशी करणार, असा खोचक सवालही त्यांनी केला. हिंगोली आणि वाशिम येथील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. विमा कंपन्यांच्या डोक्यावर 8 हजार कोटी सरकारने घातले. 1 रुपयाला विमा दिला होता. तो विमा कुठं आहे, कुणाला मिळाला. आता नुकसान भरपाई, पंचनामे थांबवा आणि शेतकऱ्यांना सरळ कर्जमुक्ती द्या, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

कोरोना काळात उद्धव ठाकरे कुठे बसून काम करत होते हे देशाला माहिती आहे. आम्ही काही काळ उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काम केलं आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असे धनंजय मुंडे कर्जत येथील पत्रकार परिषदेत बोलले होते. सर्व जिल्हा प्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढावेत. सरकारने केलेले नुकसानीचे पंचनामे तपासून पहावेत. हा घोटाळा आहे का, याची मला शंका येत आहे. सरकारनं मोठी रक्कम विमा कंपन्यांना दिली आहे. हा पैसा कोणाच्या खिशात गेलाय याची माहिती घ्या असे, आवाहन ठाकरेंनी केले.

Exit mobile version