मोकाट गुरांमुळे शेतकरी त्रस्त

मालकांनी बंदोबस्त करण्याची मागणी

| कोलाड | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील तसेच देवकान्हे परिसरातील शेतकरी मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे मेटाकुटीला आले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले कडधान्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले, तर बाहे येथे शेतकऱ्यांचे भाजी पाल्याचे नुकसान करत आहेत. या मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी एकटवणार असून ज्यांची गुरे असतील त्यांनी वेळीच आवर घाला अन्यथा गुरे पकडून गो शाळेत पाठवण्यात येतील असा अंतिम आवाहन या विभागातील शेतकऱ्यांनी ग्रामस्थांच्या वतीने केले आले आहे.

खांब देवकान्हे विभागातील तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे, बाहे आदी ठिकाणी मोकाट गुरे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याने शेतकरी संतापले आहेत. तर त्यांचा बंदोबस्तासाठी या आदी देखील सोशल मीडिया आणि वृत्त पत्रांच्या माध्यमातून सदरील मालकांसाठी आवाहन करण्यात आले होते. तसेच, सदरील खात्याला या बाबतचे उपाय योजना संदर्भात निवेदन देखील देण्यात आले आहे.

सुटलेली ही मोकाट आणि उन्नाड गुरे कोणीच्या मालकीची असल्यास येत्या तीन -चार दिवसांत त्यांना दावणीला बांधून घ्यावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी धनाजी लोखंडे, वसंतराव मरवडे, बाळा भोईर, रवींद्र मरवडे, रामचंद्र बामणे, किशोर भोईर, डॉ. श्याम लोखंडे, संतोष भोईर, पांडुरंग गोसावी, तळवली येथील पशु वैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी डॉ. एस. पी. जाधव, राम महाडिक, राम लोखंडे, राम शेलार, संदीप लोखंडे, सुरेश महाडिक, ठमाजी महाडिक, संदेश लोखंडे, गणेश महाडिक, महेश मरवडे, किशोर कान्हेकर, गजानन जंगम, अनिल खांडेकर, मंगेश लोखंडे, कल्पेश महाडिक, तळवली तर्फे अष्टमी, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे, बाहे येथील युवा शेतकऱ्यांसह जाणते शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

पुन्हा एकदा येथील शेतकरी वर्ग एकत्रित येऊन यावर उपाययोजना करण्यासाठी चिल्हे येथे सभा घेण्यात आली होती. तर सदरच्या आयोजित सभेत पुन्हा एकदा मालकांनी माणुसकीचा हात देत आपापल्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आवाहन केले आहे.
Exit mobile version