शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका

मोहन गुंड यांचे भावनिक आवाहन
बीड | प्रतिनिधी |
शेतकरी भावंनो कर्ज आज न उद्या फिटल आत्महत्या करू नका असे भावनिक आवाहन शेकाप नेते मोहन गुंड यांनी बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना निवेदनाद्वारे केलेले आहे.
दोन महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात जवळपास 50 शेतकर्‍यांनी आपले आत्महत्या करून जीवन संपवले आहे, ही गंभीर बाबा आहे अगदी कमी वयातील तरुण शेतकरी आत्महत्या करीत आहेत, रोज एक आत्महत्या होत आहे. आर्थिक विवंचनेतून मधून आत्महत्या केल्याचं समोर येत आहे.असे गुंड यांंनी निदर्शनास आणले आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना विनंती आहे तुम्हाला असलेली अडचण आज ना उद्या दूर होईल डोक्यावर असलेले कर्ज आज ना उद्या फिटेल काही अडचणी असतील खाजगी सावकार असेल बँका असतील वीज बिलाचा प्रश्‍न असेल काही शासकीय अडचणी असतील तर 9423979492 फोन करुण अडचण सांगा किंवा शेकापच्या कुठल्याही माझ्या सहकार्‍यांना कळवा, आम्ही तुमच्या सोबत आहोत,भावांनो पण आत्महत्या करून बायको लेकरं बाळाना उघड्यावर टाकू नका. आत्महत्या करणे हा मार्ग नाही जीवनात चढ उतार येत असतात, आम्ही तुमच्या सोबत आहेत आसे भावनिक आवाहन गुंड यांनी प्रसिध्दी पत्रकातून शेतकर्‍यांना केलं आहे.

Exit mobile version