। चणेरा । प्रतिनिधी ।
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व कृषी विज्ञान केंद्र रोहा यांच्या मार्फत सोमवारी (दि.24) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी मेळावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना 19 व्या हप्त्याचा लाभ वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शेतकर्यांना दाखवण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांनी विद्यापीठ विकसीत युट्युबमधील शेतकरी मार्गदर्शन, शेती माहितीचे अॅप व त्यांचा वापर याविषयी उपस्थित शेतकर्यांना सखोल माहिती दिली. मानक ब्युरो मुंबई शाखा प्रमुख प्रेमसाजनी पटनाला, शास्त्रज्ञ महेंद्रसिंग जाखर, प्रमोशन अधिकारी पुष्पेंद्र मिश्रा यांनी सहभागघेत शेतकर्यांना भारतीय मानक ब्युरो संबंधीत उपयुक्त माहिती सादरीकरणाद्वारे दिली.