| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
1984 मध्ये ज्या शीख विरोधी दंगली दिल्लीत उसळल्या. त्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुणार यांनी दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सज्जन कुमार यांना 1 नोव्हेंबर 1984 या दिवशी सरस्वती विहार या ठिकाणी झालेल्या वडील मुलाच्या हत्येप्रकरणी न्यायलायने दोषी ठरवलं होतं. 12 फेब्रुवारीला हा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्यानंतर मंगळवारी त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआय आणि तक्रारदारांनी सज्जन कुमार यांना फाशी देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने सज्जन कुमार यांना 12 फेब्रुवारीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पंजाबमध्ये झालेल्या ऑपरेशन ‘ब्लू स्टार’नंतर 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर 1 नोव्हेंबरच्या दिवशी राजधानी दिल्लीत शिखांविरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात शीख समाजातील लोक आणि त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करण्यात आलं.