गडब येथे शेतकर्‍यांची निदर्शने

। गडब । वार्ताहर ।
भारत बंदला प्रस्तावित डोलवी औद्योगिक शेतकरी संघर्ष समितीने पाठिंबा देऊन गडब येथे कृषी कायद्या विरोधात निदर्शने केली. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेसचे चिटणीस परशुराम म्हात्रे गडब- काराव ग्रामपंचायतीचे उपसरपंच लक्ष्मण कोठेकर, के जी म्हात्रे, सुशील कोठेकर सिताराम चवरकर, नित्यानंद पाटील, महेश पाटील, प्रभाकर म्हात्रे,चंद्रकात पाटील, तुकाराम पाटील किसन पाटील, कमलाकर पाटील, आदिसह गडब, डोलवी, वडखळ परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version