शेतकर्‍यांना नोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी

। रोहा । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हमी भाव केंद्रावर भात विक्री करण्यासाठी शासनाकडे नोंदणी करणे गरजेचे असते. शासनाने शेतकर्‍यांना नोंदणीसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती.पण ऑक्टोबर महिन्यात शेतकरी वर्ग कापणी, बांधणीच्या कामात व्यस्त असल्याने अनेक शेतकरी नोंदणी पासून वंचित राहिले आहेत.जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकर्‍यांना हमी भाव केंद्रावर भात पिकाची विक्री करता यावी यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी शेकाप नेते राजेश सानप यांनी केली आहे.

Exit mobile version