फॅशन, इंटिरियर डिझायनर ब्रँड बनू शकतात

फॅशन डिझायनर अफशा कपाडिया यांचे प्रतिपादन
आयआयडीटी चे सेमिनार उत्साहात

| पनवेल | प्रतिनिधी |

फॅशन डिझायनर एका मॉडेलला तयार करून आपल्या समोर सादर करतो. स्वतः मॉडेल बनत नाही; परंतु फॅशन डिझायनर आणि इंटिरियर डिझायनर नक्कीच एक ब्रँड बनू शकतात, असे प्रतिपादन आयआयडीटी च्या संचालिका अफशा कपाडिया सचदेव यांनी केले. त्या खारघर येथे आयआयडीटीच्या आजच्या सेमिनारप्रसंगी बोलत होत्या.

इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटीव्ह डिझाईन टेक्नॉलाजी चे आद्या 2.ज सेमिनार खारघर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या साथीने जोशात संपन्न झाले. आयआयडीटी संस्थेमार्फत शनिवारी (दि.7 मे) संध्याकाळी खारघर येथे आयोजित सेमिनारमध्ये फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डिझायनिंग या क्षेत्रात नाव कसे कमवावे, स्वतःला परिपूर्ण कसे बनवावे, या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे या सारख्या विविध विषयांवर यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना 100% नोकरी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संस्थेच्या डिरेक्टर अफशा कपाडिया सचदेव यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित विद्यार्थाना मार्गदर्शन करण्यासाठी केएसडीपी च्या इंटेरियर डिझायनर कोमल सचदेव, फॅशन डिझायनर शहा अली अहमद उपस्थित होते. या वेळी विद्यार्थांनी बनवलेल्या नवीन कलाकुसरी कामाचे मान्यवरांनी कौतुक करून योग्य ते मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्साह द्विगुणित झाला. आपल्याला सगळ्यांना तज्ञ मार्गदर्शकांची गरज असते. जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा आम्ही देखील अश्या सेमिनारमध्ये भाग घेतला आहे. मला या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधायला मिळाला आणि माझा अनुभव सांगता आला या साठी मी आय आय डी टी ची आभारी आहे असे त्या म्हणाल्या. तर फॅशन डिझायनर शहा अली अहमद यांनी सांगितले की हे वेगळे जग असून यात प्रत्येक ठिकाणी चॅलेंज असते. त्या दृष्टीने आव्हानाला सामोरे जायचे असते. जगात जे चालले आहे त्यातून नवीन व जुन्याचे एकत्रीकरण करून एक वेगळी थीम व फॅशन तयार करणे व ती लोकांसमोर मांडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात पुढे जायचे असेल तर घरात बसून अनुभव येणार नाही यासाठी बाहेर पडून वेगवेगळे अनुभव घेतले पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघणे आणि त्यातून काहीतरी करता येणे हे महत्वाचे आहे. शिक्षक तुम्हाला मर्यादित ज्ञान देऊ शकतात परंतु त्याचे 100 पटीने वाढवण्याचे काम तुमचे आहे.

कोमल सचदेव, इंटिरिअर डिझायनर
Exit mobile version