डॉक्टरांना न्याय देण्यासाठी सामाजिक संघटनांचे उपोषण

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील सुगवेकर आळी मधील डॉ. सरोदे यांच्या दवाखानाचे जागेवर जुने बांधकाम तोडून टाकले आहे. त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्याची परवानगी नेरळ ग्रामपंचायत देत नाही. त्यामुळे सदर डॉकटर कर्जत येथे उपोषणाला बसले असून बुधवारी भर पावसात उपोषण सुरू झाले आहे. नेरळ ग्रामपंचायत येथील डॉ. दिनकर सरोदे वय वर्षे 70 यांना 35 वर्षे असलेला जुना दवाखाना मोडुन नवीन दवाखाना बांधकाम करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी गेली दीड वर्षे अनेक कारणे पुढे करून बांधकाम परवानगी देण्यास टाळाटाळ केली.

गेले दीड वर्षे सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही बांधकाम परवानगी दिली नाही. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस मित्र संघटनेच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश कोकण अध्यक्ष रमेश कदम यांनी लोकमांन्य टिळक चौक कर्जत येथे बेमुदत उपोषण छेडले आहे. आता तरी ग्रामपंचायत दखल घेणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

डॉ दिनकर सरोदे यांनी आपल्या कार्यालयात बंधक परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला आहे. ती बांधकाम परवानगी देण्यासाठी नेरळमध्ये लागू असलेल्या नेरळ विकास प्राधिकरण यांच्या नियमानुसार कागदपत्रे सर्वांना देणे बंधनकारक आहे. तशी यादी आमच्या कार्यालयाने त्यांना दिली आहे. मात्र त्यांच्याकडून यादी नुसार कागदपत्रे दिली गेलेली नाहीत. त्यामुळे नियमा बाहेर जाऊन बांधकाम परवानगी देता येणार नाही. त्यांनी योग्य कागदपत्र देऊन बांधकम परवानगी घ्यावी.

उषा पारधी, सरपंच नेरळ ग्रामपंचायत
Exit mobile version