सहा गंभीर जखमी; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल
। रायगड । प्रतिनिधी ।
अलिबाग-पेण मार्गावर गुरुवारी (दि.26 ) पहाटेच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात तिनविरा ते मैनुशेठ वाड्याच्या दरम्यान सकाळी सहा वाजता झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये इरटीका आणि इको या दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.







