। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आज दि.15 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 03:00 वा.चे सुमारास पुणे मुंबई लेनवर 38.500 या ठिकाणी ट्रक नं TN 77 D 9826 वरील चालक अनडुरोस अँथनी, रा.तामिळनाडू याचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने त्यानें ट्रक नं MH 50 N 0977 ला पाठीमागून जोरात धडक मारली. या अपघातामध्ये ट्रक चालक हा गंभीर जखमी होऊन केबिनमध्ये अडकून होता आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. यातील क्लिनर व्यंकट आचलम सुब्रमण्यम रा. तामिळनाडू यास किरकोळ दुखापत झाली.
अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
आय आर बी पेट्रोलिंग, बोरघाट महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा यांनी या अपघातात मदत केली.
खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाल्याने पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.






