तळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

। तळा । वार्ताहर ।
शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा एस. एस. निकम इंग्लिश स्कूल तळा येथे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शाळेचे चेअरमन विक्रांत सप्रे, सदस्य श्रीराम कजबजे, विजय तांबे, विजय ठक्कर, मुख्याध्यापक राजेश आगिवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. एस. एस. निकामी इंग्लिश स्कूलचा यावेळी 100% निकाल लागला असून, सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक सायली गाडगीळ (89.80 %) गुण, द्वितीय क्रमांक श्रावणी भोसले (82.80 %) गुण, तर तृतीय क्रमांक कुमार ऋग्वेदा गोठेकर (89.80 %) गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत.

यावेळी पुरुषोत्तम मुळे व चंद्रकांत रोडे यांनी शाळेच्या उत्तम निकालाची परंपरा कायम राखलेबद्दल गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक केले. यश संपादन करताना शिक्षक श्री. राजेश आगिवले, श्री. निलेश सायगावकर, सौ. रेश्मा बंगाळे, कु. रिंकू गुरव, सौ. दीया वारंगे, श्री. संतोष म्हात्रे, सौ. शिल्पा गुळवे इत्यादी शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रेशमा बंगाळे तर आभार श्री. राजेश आगिवले यांनी मानले.

Exit mobile version