शट, अप…! ब्रिजभूषणचा थयथयाट; महिला पत्रकाराशी गैरवर्तन, माईकच तोडला
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राने भाजप खासदाराच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे संतापलेल्या ब्रिजभूषण यांनी आता थयथयाट सुरु केला आहे. याचे प्रत्यंतर प्रसारमाध्यमांसमोरच आले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी प्रश्न विचारणार्या महिला पत्रकाराशी गैरवर्तन करीत तिचा थेट माईकच मोडून टाकल्याने प्रसारमाध्यमांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रावर भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष यांची चौकशी करण्यात आली तेव्हा खासदाराचा संयम सुटला.
सर्वप्रथम त्यांनी मीडियाच्या मत्याफ प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह प्रचंड संतापले. त्यानंतर त्यांचा माईक तोडला. ब्रिजभूषण यांच्या या वागण्याने दिल्ली पोलीस आरोपपत्रामुळे पूर्णपणे संतप्त झाल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपपत्रावर पत्रकाराने भाजप खासदाराला प्रश्न केला. त्यावेळी ते लखनौ विमानतळावर होते. दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रावर काय बोलणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाने ब्रिजभूषण शरण सिंह चिडले. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, शट अप…! पत्रकार प्रश्न विचारत होते आणि ते पुढे जात होते. यानंतर ब्रिजभूषण यांचे म्हणणे घेण्यासाठी कारमध्ये जात असताना महिला पत्रकाराने माईक पुढे केला, त्यानंतर त्यांनी क्षणार्धात कारचा दरवाजा बंद केला. यामुळे पत्रकाराच्या हाताला दुखापत होऊन माईक खाली पडला आणि ब्रिजभूषण तेथून निघून गेले.
या प्रश्नांवर संतापले?
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर पत्रकाराने ब्रिजभूषण विमानतळावर आल्या प्रश्न विचारले. पत्रकाराने विचारले की दिल्ली पोलिसांनी तुमच्यावर वारंवार लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही राजीनामा द्याल का? या प्रश्नाला उत्तर देताना, राजीनामा का? पत्रकार म्हणाला, दिल्ली पोलिसांनी केस चालवण्याबाबत बोलले आहे. तुम्हाला ट्रायलला जावे लागेल. या प्रश्नावर संतप्त झालेल्या ब्रिजभूषण यांनी पत्रकाराला गप्प राहण्याची सूचना केली. मग पुढे निघाले. सततच्या प्रश्नांमुळे ब्रिजभूषण यांचा संयम सुटला आणि पत्रकाराशी गैरवर्तन केले.
ठोस पुरावे मिळाले
भारतीय कुस्ती महासंघाच्या अधिकार्यांनी पोलिसांना चार फोटो पुरवले आहेत. परदेश दौर्यात पीडित महिला कुस्तीपटूंसह ब्रिजभूषणही होते, हे दर्शवणारे ते फोटो आहेत. या पैकी दोन फोटोंमध्ये ब्रिजभूषण महिला कुस्तीपटूंबरोबर गैरवर्तन करताना दिसत आहेत, असं आरोपपत्रात म्हटलं आहे. तसंच, ब्रिजभूषण सिंह यांचे कार्यालय, कुस्ती महासंघाचे कार्यालय आणि ब्रिजभूषण सिंह यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने तेथील पुरावे पोलिसांना मिळू शकले नाहीत. फोटोंसह साक्षीदारांचे कॉल डिटेल्सही तपासण्यात आले आहेत. यानुसार, लैंगिक छळाच्या घटना ज्या ठिकाण झाल्या त्याठिकाणी ब्रिजभूषण सिंह उपस्थित होते, असंही या आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे.