कोविड योद्धे, जवानांसाठी पंधरा हजार राख्या; ऋणानुबंध उपक्रमातून निर्मिती

| अलिबाग | प्रतिनिधी |
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत एक राखी देशासाठी, एक ऋणानुबंध उपक्रम राबविण्यात आला आहे. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान रोहा, जेएसएस, रायगड, व आई डे केअर विशेष मुलांसाठीचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पेण यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाजन्य परिस्थिती देशासाठी कार्यरत असणारे सैनिक, सामाजिक संस्था, देशाच्या संरक्षणासाठी 24 तास कार्यरत असणारे पोलीस ,नर्सेस, हॉस्पिटल यांच्यासाठी साधारण 15 हजार राख्यांचे वाटप करण्यात आले अशी माहिती संचालक विजय कोकणे व श्री अनिकेत पाशीलकर यांच्या माध्यमातून देण्यात आली.

सदर राख्या जनशिक्षण संस्थान रायगडचे अपंग मतिमंद व आदिवासी प्रशिक्षणार्थी व सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान- रोहा चे उत्स्फूर्त कार्यकर्ते यांनी बनवलेल्या व संकलित केलेल्या आहेत. उपक्रमातून प्रशिक्षणार्थींना रोजगार निर्मिती, आत्मविश्‍वास वृद्धी, त्याचबरोबर कोरोना योद्ध्यांचे आभार व ऋणानुबंध जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सीमेवरील जवानांपैकी कृतज्ञता व्यक्त करणे हे कार्य जनशिक्षण संस्थान रायगड करीत आहे.

Exit mobile version