आई डे केअरच्या विशेष मुलांनी बनवल्या राख्या
| रसायनी | वार्ताहर |
आई डे केअर विशेष मुलांसाठीचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने देशप्रेमी राष्ट्र रक्षक व देशासाठी कार्यरत असणारे भारतीय सैनिक, सामाजिक संस्था, देशाच्या संरक्षणासाठी 24 तास कार्यरत असणारे पोलीस, रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांना ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत ‘एक राखी देशासाठी’ एक ऋणानुबंध उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, साधारण 21 हजार राख्या जनशिक्षण संस्थान रायगडचे प्रशिक्षणार्थी आई डे केअरच्या विशेष मुलांनी बनविलेल्या असून, त्या विविध स्टॉलच्या माध्यामातून सर्वत्र जिल्हाभरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती संचालक विजय कोकणे व कार्याध्यक्ष स्वाती मोहिते यांच्या माध्यमातून देण्यात आली.
राख्या जनशिक्षण संस्थान रायगडचे अपंग, विशेष दिव्यांग व आदिवासी प्रशिक्षणार्थी जन शिक्षण संस्थान रायगडचे प्रशिक्षणार्थी व उत्स्फूर्त कार्यकर्ते यांनी बनवलेल्या व संकलित केलेल्या आहेत. संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉ. विजय कोकणे, मार्गदर्शक प्रा. अविनाश ओक व नरेन जाधव, आई डे केअर संस्थेच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील, उपाध्यक्षा डॉ. शिल्पा ठाकूर, संस्थापिका स्वाती मोहिते, युनिट इंचार्ज विद्या खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून विविध कौशल्य उपक्रम राबिवले जात असताना ‘कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार’ यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील 20 वर्षांपासून सक्रियपणे सुरु आहे. सदर ऋणानुबंध उपक्रमातून प्रशिक्षणार्थींना रोजगारनिर्मिती, आत्मविश्वास वृद्धी, त्याचबरोबर महाराष्ट्र रक्षक देशप्रेमी योद्ध्यांचे आभार व ऋणानुबंध जोपासण्याचा प्रयत्न तसेच सीमेवरील जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे कार्य जन शिक्षण संस्थान रायगड करीत आहे. सदर योद्ध्यांचे आभार व ऋणानुबंध कार्य रक्षाबंधन दिनापर्यंत सुरू राहणार आहे.