। कर्जत । प्रतिनिधी ।
अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेत सन 1981-82 साली इ. दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा माणगांव येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
’आठवण 82’ नावाने व्हॉट्सअॅपवर सक्रिय असलेल्या व काही वर्षांनी हिरक महोत्सवी साठाव्या वर्षात प्रवेश करणार्या अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या विद्यार्थींच्या या ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या शाळेच्या नविन वर्गखोलीच्या बांधकामासाठी 2 लाख 51 हजाराची भरीव देणगी दिली होती. बेलापुर येथील शाळेसाठी तीन सॉफ्टबोर्ड, शासकीय कृपा महिला वसतिगृहातील महिला व दोन मुलांना नविन कपडे, जांभीवली येथील वनवासी कल्याण आश्रमाला दोन मोठ्या गॅस शेगड्या, जि.प.शाळा शिरसे तसेच सांगवी शाळेला वॉटर प्युरिफायर तसेच तमनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले होते.
या अत्यंत ह्रद्य अशा स्नेहबंध मेळाव्याला सुनिल भोपतराव, वर्षा देसाई, सुनिता देशमुख, असिफ मिर्झा, यशवंत चितळे, शुक्लेंदू जोशी, जयश्री संभूस, मंजुषा देव, निनाद आगाशे, पारस जैन, डॉ. राजस रेडकर, राजू पोतदार, राजेश कुळकर्णी, संदिप जोशी, संजय मालगुंडकर, शरद तुपे, वंदना लाड, कविता धर्माधिकारी, सिमंतिनी शिंदे, अनिल जोशी, पुरूषोत्तम वाणी, राजश्री बाम, सुजाता लाड, सविता चंदने, गुरुनाथ चव्हाण, गोविंद देवडा तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे दिनेश अडावदकर, विदेशातून सुनिल कुलकर्णी, समीरा मुल्ला उपस्थित होते.