। बोर्लीपंचतंन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे येथील श्रीधर हरी चांदिवकर यांनी राजिप मराठी शाळे शेजारी असलेली त्यांची दोन गुंठे जागा ही शाळेला भेट दिली. यासाठी शाळेच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला सरपंच कांचन शिंदे, सदस्य महेंद्र गोरीवले, रंजना सायगावकर, शरद साठे, सखाराम लांजेकर, सानवी शिगवण, योगिनी गजमल, सुचिता मोहिते, श्रेया भोजने, शमिका शिंदे आदी उपस्थित होते.