नीड येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील साळोख तर्फे नीड या गावातील एका तरुणाने 14 वर्षीय विद्यार्थिनीच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, तसेच मोबाईल भेट देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या तरुणाने मोबाईल घेतला नाही तर तुझ्या आईला ठार करेन अशी धमकी दिली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अर्थात पोस्को खाली गुन्हा दाखल केला आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मौजे साळोख तर्फे नीड गावातील 14 वर्षीय विद्यार्थीनी आपल्या मैत्रीणीकडे वही आणण्याकरीता गेली होती. वही घेऊन परत घरी येत असताना तेथे एका तरुणाने 14 वर्षीय विद्यार्थिनीला रस्त्यात गाठून तुझ्या मैत्रीणीच्या दुकानात मोबाईल ठेवला आहे. तसेच तीच्या शरीराला स्पर्श करीत लज्जा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. तसेच तो मोबाईल घेतला नाही तर तुझ्या आईला मारिन अशी धमकी दिली. याबाबत त्या विद्यार्थिनीच्या आईने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर कर्जत पोलीस ठाणे येथे सदर प्रकारचा गुन्हा नोंद केला असून, गु.र.नं. 317/2021 भा.दं.वि.क. 354, 506, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम, 2012 चे कलम 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को अंतर्गत गुन्ह्याचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अथने करीत आहेत.

Exit mobile version