अखेर डॉ.सुहास माने यांची उचलबांगडी

डॉ. अंबादास देवमाने नुतन जिल्हा शल्य चिकित्सक

| रायगड | खास प्रतिनिधी |

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ.अंबादास देवमाने यांची नियुक्ती सरकारने केली आहे.

भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराबाबत विविध स्तरातून डॉ. माने यांच्या विराेधात तक्रारी सुरू होत्या. पोलीस भरती प्रकरणात पैसे घेतल्या प्रकरणी एका लिपीकाला अटक आणि जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. माने यांना तात्पुरता जामीन मिळाला हाेता. विधीमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये हा विषय चांगलाच गाजला. त्यानंतर सरकारने याची दखल घेत डॉ. माने यांची बदली केल्याचे बाेलले जाते.

डॉ.देवमाने हे ग्रामीण रूग्णालय राजुरा, जि.चंद्रपूर येथे सध्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे डॉ.सुहास माने यांना नवीन पदस्थापना देण्यात आलेली नाही. त्यांना नंतर पदस्थापना देण्यात येणार आहे. तोपर्यंत त्यांनी उप संचालक आरोग्य सेवा ठाणे यांच्या कार्यालयात हजर रहायचे आहे, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभारा बाबत तसेच जिल्हा शल्य चिकीत्सक सुहास माने यांच्या बेकायदेशीर कारभाराबाबत त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरातून करण्यात येत हाेती.

Exit mobile version