। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीतील उत्तम स्टील या कंपनीत मंगळवारी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीतील धुराचे लोट एवढे प्रचंड होते की परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. ही आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून आग आटोक्यात आली असल्याचे बोलले जात आहे. परंतु, या आगीत कोणतीही जिवीत किंवा आर्थिक हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.