माथेरानमध्ये मोबाईल स्वच्छतागृहाला आग

| माथेरान | वार्ताहर |

वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेच्या आवारात असणाऱ्या जुन्या प्लास्टिक मोबाईल स्वच्छतागृहाला सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यावेळी आगीवर नियंत्रण राखण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी नादुरुस्त असल्याने स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण ठेवण्यात आले. आजूबाजूला वस्ती नसल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी सुद्धा बाजूच्या झाडांना आगीची झळ लागली आहे. आगीचे कारण अद्याप समजले नसून त्याठिकाणी गर्दुल्ल्यांचा वावर असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी संबंधित खात्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे स्थानिक बोलत आहेत.

अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याने नुकताच 2 फेब्रुवारी रोजी एका हॉटेल मधील माळ्याच्या रिकाम्या घराला आग लागली होती. त्यावेळेस सुध्दा आग विझविण्यासाठी तेथील कामगारांना त्रासदायक ठरले होते. आताही तीच परिस्थिती निर्माण झाली होती. निदान यापुढे तरी लवकरच अग्निशमन गाडी दुरुस्त करून आणणे गरजेचे आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण असाही प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version