। ठाणे । प्रतिनिधी ।
घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरातील हायपर सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावरील एका नामांकित बूट कंपनीच्या दुकानाला आग लागली. दुकानाच्या बाजूला असलेला गाळा रिकामा असल्याने आग पसरली नाही. ही आग मंगळवारी (दि. 28) सकाळी पावणे आठ ते आठ वाजण्याच्या सुमारास लागली. तसेच, लागलेली आग एक तासात नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र, आगीचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकार्यांनी दिली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, या आगीत दुकानातील बुट आणि कपडे आदी वस्तू जळाल्या असून त्या दुकानाचे नुकसान झाले आहे.