नेरळमध्ये फायरप्रूफ दादूसची क्रेज

उकळत्या तेलात हात घालून काढतो पदार्थ

| नेरळ | वार्ताहर |

उकळत्या तेलात हात घालून पदार्थ बाहेर काढणार्‍या नेरळच्या दादूसची क्रेझ आता सर्वत्र होऊ लागली आहे. त्याचा अजब चमत्कार पाहायला सध्या लोकांची गर्दी होत आहे. तर यामुळेच तो फायरप्रूफ दादूस म्हणून ओळखला जात आहे.


प्रवीण कोळंबे उर्फ दादूस हा नेरळमध्ये राहतो. आगरी समाजामध्ये भावाला दादूस असे म्हणतात. सोळ्याव्या वर्षी पहिले दुकान दादूस या नावाने सुरु केले त्यामुळे प्रवीण याला दादूस असे नाव पडले. प्रवीणला लहानपणापासूनच स्वयंपाकात रुची निर्माण झाल्याचे तो सांगतो. जसजसा तो मोठा होत गेला त्याची जिज्ञासा वाढत गेली. त्यामुळे कुठेही एखादा पदार्थ चाखला की त्याची रेसिपी शोधण्याकडे त्याचा कल असायचा. अभ्यासात तसे त्याचे विशेष लक्ष नसल्याने जेमतेम 10 वी पर्यंत त्याचे शिक्षण झाले. आता पुढे प्रवीणचे काय होणार ही चिंता घरच्यांना सतावत होती. यादरम्यान घरी विविध रेसिपी बनवून त्यांचे प्रयोग घरच्यांवर आणि मामा आदींसगळ्यांवर रोज होत असे. पण या प्रयोगातून प्रवीण स्वतःला अधिक सुधारत गेला.

फास्ट फूड सेंटरमध्ये मन्चुरिअन भजी तेलात सोडताना त्याला एके दिवशी अचानक जाणवलं की त्याला तेलाचा चटका बसतच नाही. त्यामुळे त्याने थेट उकळत्या तेलात हात घालायला सुरवात केली. मात्र तेलाचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. तेव्हा उकळत्या तेलातून त्याने थेट पदार्थ हात घालून बाहेर काढायला सुरवात केली. पदार्थाचे तापमान हे साधारण 70 अंश असते पण माझी स्कीन ही 80 अंश पर्यंत तापमान सहन करू शकते असे त्याने सांगितले आहे. बघता बघता संबंध पंचक्रोशीत त्याची हि कीर्ती पसरली. आणि फायरप्रूफ दादूस अशी नवी क्रेज नेरळमध्ये पसरली. दरम्यान दिवसाकाठी सुमारे 1000 ते 1500 प्रवीण या फास्ट फूड सेंटरमधून उत्पन्न कमवत आहे. तर प्रवीणचे हे व्हीडीओ व्हायरल झाल्याने नक्की उकळत्या तेलातून पदार्थ कोण कसे काढू शकतो हे पाहण्यासाठी त्याच्या दुकानावर चाहत्यांची गर्दी होत आहे.

मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिज. व्यवसायात उतरायला गरज असते ती कष्ट करण्याची जिद्द आणि हिम्मत यांची .यांच्या जोरावर यशाची अनेक शिखरे तुम्ही पादाक्रांत करू शकता आणि समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करू शकता.

प्रवीण कोळंबे, नेरळ

पाठीराख्या बहिणीची साथ
आजवरच्या प्रवासात घरच्यांची साथ खूप महत्वाची ठरली आहे. आमच्या कोळंबे कुटुंबाला कलेचा वारसा आहे तो पुढे नेण्याचे काम मी करत आहे. पण या सगळ्यात बहीण कविता विकास शिंदे हिची भक्कम साथ लाभली आहे. तर माझी ताईच माझी सपोर्ट सिस्टीम आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात. त्याचप्रमाणे माझ्या मागे माझी आई असल्याने इथवर मजल मारू शकलो, असे कृतज्ञता पुरवत प्रवीणने सांगितले आहे.

Exit mobile version