। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक 4 जवळ गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचे दोन्ही हात छाटले गेल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. न्यायालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आता न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार
