एलईडी मासेमारीला पाठिंबा दिल्याचा आरोप
। उरण । वार्ताहर ।
राज्यातील पारंपरिक मच्छीमारांमध्ये सध्या तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मत्स्य मंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मच्छीमार संघटनांनी त्यांच्यावर एलईडी मासेमारीला अप्रत्यक्ष पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पूर्वी माजी मत्स्य मंत्री असलम शेख यांच्या काळात एलईडी मासेमारी रोखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले होते. मात्र, मंत्री नितेश राणे यांनी बारा नॉटिकल मैलांच्या बाहेर पर्ससीन मासेमारी केली तरी हरकत नाही, असे विधान केले आहे. वास्तविक, पर्ससीन मासेमारी ही एलईडी लाईटशिवाय शक्यच नसते. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे बेकायदेशीर मासेमारीला चालना मिळत असल्याचा आरोप मच्छीमार संघटनांनी केला आहे.