कळंबोली वसाहतीला पुराचा धोका

। पनवेल । प्रतिनिधी ।

पालिकेच्या माध्यमातून कळंबोली वसाहतीत सध्या विकास काम सुरु आहेत. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नाल्यांचे रुंदीकरण आशा स्वरूपाची कामे सुरू आहेत. या कामांदरम्यान पावसाळ्यात वसाहतीचे भरतीच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेले धारण तलाव गाळाने भरले आहे. त्यामुळे या तलावतील गाळ न काढल्यास वसाहतीला पुराचा धोका असल्याची भीती शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी व्यक्त केली आहे. तसेच, वसाहतीत पालिकेच्या माध्यमातून सुरु असलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप देखील भगत यांनी केला आहे. त्यांनी कामाच्या दर्जात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Exit mobile version