फोफेरी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची सभा

| वाघ्रण | वार्ताहर |

आलिबाग तालुक्यातील माध्यमिक विद्या मंदीर फोफेरी हायस्कूलच्या सन 1984 च्या दहावीच्या बोर्डाच्या माजी विद्यार्थ्यांची सभा शुक्रवारी (दि.8) श्री क्षेत्र भुवनेश्‍वर येथे घेण्यात आली होती. माध्यमिक शिक्षक उदय पाटील यांनी सभेचे प्रास्ताविक केले. यावेळी माजी विद्यार्थी जयदीप पाटील नौदल पदाधिकारी दीपक यशवंत पाटील यांना आस्था फाऊंडेशन महाराष्ट्रचा राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजदीप पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भुवनेश्‍वर मंदीर ट्रस्ट 18 गाव समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. अविनाश पाटील, मच्छींद्र पाटील, वैभव धुमाळ, रामकृष्ण पाटील, शंकर मोकल, सविता पाटील, सुहास पाटील, महेद्र पाटील, अविनाश वर्तक, भालचंद्र पाटील, रामकृष्ण पाटील, चंद्रशेखर पाटील, दिलीप पाटील, हरीश्‍चंद्र म्हात्रे, संतोष पाटील, जयवंत वाणी, सिमा पाटील, अनंत मोकल उपस्थित होते.

Exit mobile version