तहसीलदार रोहन शिंदे यांचे आवाहन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 18 डिसेंबरला मतदान होणार असून, या निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काम करणार्या सर्व अधिकार्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. गावात कुठल्याही विकासकामांची भूमिपूजने, जातीय धार्मिक भावना भडकेल असे वक्तव्य करु नये, असे आवाहन मुरुड तहसीलदार अमित पुरी यांनी केले.
विकासकामांबाबत कोणतीही आश्वासने किंवा मतदारांवर प्रभाव पडेल असं वस्तूंची वाटप करता येणार नाही. निवडणुका प्रचारसभा, रॅली परवाना, ई-प्रचार परवाना, डिजिटल बॅनर, पोस्टर परवाना, वाहन परवाना पाहिजे असेल तर त्याकरिता मुरुड तहसीलदार कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाचे प्रमुख नारायण गोयजी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अर्जाचे नमुने घेऊन कार्यक्रम घेण्याच्या आधी तीन दिवस अर्ज देण क्रम प्राप्त आहे. जर विना परवाना कार्यक्रम केल्यास, तर आचारसंहितेचा भंग होईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. तरी आचारसंहितेचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन मुरुड तहसीलदार कार्यालय निवडणूक नायब तहसीलदार अमित पुरी यांनी केले आहे. ही आचारसंहिता 23 डिसेंबरपर्यंत असणार आहे.