। महाड । प्रतिनिधी ।
आजादी का अमृत महोत्सव 2022 अंतर्गत उप वन संरक्षक रोहा वनविभाग आणि सहाय्यक वनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 7 जुलै या कालावधीत वृक्ष लागवड कार्यक्रम महाड तालुक्यात आयोजित करण्यात आला आहे, त्या कार्यक्रमा अंतर्गत आज तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावामध्ये महाड पत्रकार संघा तर्फे वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली, यावेळी महाड मधील वन अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते. यावेळी महेश शिंदे, रोहित पाटील, उदय सावंत, रघुनाथ भागवत, चंद्रकांत कोकणे, राकेश साहू उपस्थित होते. महाड तालुक्यातील दासगाव, बिरवाडी, किल्ले रायगड ,महाड, दापोली, तळीये या गावा मध्ये वृक्ष लागवड करण्यास येणार आहे.
महाडमध्ये वनविभागाचा वन महोत्सव
