माजी जि.प. सदस्य बाजीराव परदेशी यांचे निधन

| उरण | वार्ताहर |

राजकीय क्षेत्रात आपल्या नावाची एक वेगळीच ओळख निर्माण करणारा उरण तालुका काँग्रेस पक्षाचा युवा नेता, चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पक्ष प्रतोद बाजीराव परदेशी यांचे गुरुवारी (दि.24) खारघर येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्सूसमयी त्यांचे वय 58 वर्षे होते. त्यांच्या निधनानंतर चिरनेर परिसरात शोककळा पसरली आहे.

ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील दामा परदेशी कुटुंबात जन्मलेले बाजीराव परदेशी हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच पक्षप्रतोद म्हणून उरण-चिरनेर परिसरातील सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले.

खारघर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचे निधन झाले. चिरनेर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हा माजी अध्यक्ष आर.सी. घरत, सरचिटणीस मिलिंद पाडगांवकर, उद्योगपती पी.पी.खारपाटील, उद्योगपती अनिल मुंबईकर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उद्योगपती मिलिंद ठाकूर, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य डॉ. मनिष पाटील, महेंद्र ठाकूर, वैजनाथ ठाकूर, माजी सभापती भास्कर मोकल, सामाजिक कार्यकर्ते बी.एम.ठाकूर, शेकापचे ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, जे.डी.जोशी, कैलास म्हात्रे, यादव मुंबईकर, प्रकाश पाटील तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Exit mobile version