| अलिबाग | प्रतिनिधी |
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवप्रेरणा प्रतिष्ठान वेश्वी यांच्यामार्फत किल्ले व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुलांना आपल्या परंपरेची व संस्कृतीची जाण असावी या अनुषंगाने शिवप्रेरणा प्रतिष्ठान मार्फत पाच वर्षांपूर्वी या स्पर्धेची सुरुवात केली होती. ही परंपरा कायम ठेवत यावर्षी ही स्पर्धा घेतली. साधारण 25 किल्ले व 24 रांगोळी स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यात किल्ले लहान गटात प्रथम क्रमांक दूर्वा समीर शेळके, ग्रुप द्वितीय क्रमांक रुद्र प्रशांत गोळे व तृतीय क्रमांक मयंक मगर तसेच मोठा गट प्रथम क्रमांक दीप किरण काकडे, द्वितीय क्रमांक ऋषिकेश माळवी व तृतीय क्रमांक श्रेयस ठाकूर यांनी मिळवला. रांगोळीत लहान गट प्रथम क्रमांक रिया पाटील, द्वितीय क्रमांक वैभवी सुमित शेळके व तृतीय क्रमांक धनु गोतावडे तसेच मोठा गट प्रथम क्रमांक उत्कर्षा रमेश शेळके, द्वितीय क्रमांक स्नेहल किरण कदम तृतीय क्रमांक कोमल तडाके यांनी पटकावला. स्पर्धेचे परीक्षण रोहित पवार, विशाल आढाव, श्रीकांत म्हात्रे व अंकित मिंढे यांनी केले.