परळी येथे हॉस्पिटलची पायाभरणी

| सुधागड -पाली | वार्ताहर |
श्री राज मेडिकल अँड हेल्थकेअर सेंटर व ग्रामीण चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून नव्या हॉस्पिटलच्या वास्तूचे भूमिपूजन निलेशभाई मेहता यांच्या हस्ते पाली तालुक्यातील परळी येथे करण्यात आले. यावेळी ऐशियाटिक चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी नितीन र् अजमेरा , हितेनभाई ठक्कर, श्रीमद राजचंद्र आश्रमचे सर्व ट्रस्टी तसेच तहसीलदार उत्तम कुंभार, परळी ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश कुंभार, वर्‍हाड जांभूळपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच श्रद्धा कानडे, पांडुरंग झोरे व पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परळी येथे सुरु होणार्‍या या हॉस्पिटलमध्ये आधुनिक सुविधा प्राप्त करून देणारे 39 बेडचे हॉस्पिटल तयार होणार आहे.

Exit mobile version