चुकिच्या दिशेने वाहन चालविणे पडले महागात

पनवेल । वार्ताहर ।
चार अनोळखी इसमांनी किरकोळ कारणावरून मोटारसायकलस्वारास जबरी मारहाण केल्याची घटना ओरियन मॉल समोरील सर्व्हिस रोड वर घडली आहे. राहुल चव्हाण (वय 33) हे त्यांचा मित्र अविनाश कांबळे यांचेसह त्यांच्या मोटारसायकलीवरून घरी जात असताना ओरियन मॉल समोरील सर्व्हिस रोडवर आरोपी हे चारचाकी वाहनातून विरुद्ध दिशेने जात होते. त्यावेळी राहुलने तुम्ही चुकीच्या का जात आहेत, असे आरोपींना विचारले. याच गोष्टीचा राग आल्याने त्यांच्यात वादावादी सुरु झाली. त्यानंतर चार अनोळखी इसमांनी आपसात संगनमत करून त्या दोघांना शिवीगाळ केली. तसेच राहुल चव्हाण यांना त्यांच्याकडे असलेल्या रॉड, बेल्ट व काचेची बॉटलने मारहाण करून त्यांना जखमी केले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version