। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील कोन गावाच्या हद्दीत गुरूवारी (दि.6) सकाळच्या सुमारास चार वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कोन गावाजवळ एक कंटेनर आणि त्याच्या बाजेला एक वाहन पनवेल एक्झिट येथे थांबले होता. आणि त्यांच्या मागेच आणखी एक ट्रक थांबला होता. तेवढ्यात त्या ट्रकच्या मागून येणार्या कंटेनरवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. तो ट्रक पुढे जाऊन समोर उभे असलेले वाहन आणि कंटेनर या दोघांना मागून धडकला. या अपघातात दोन चालकांसह एका क्लीनरला दुखापत झाली. त्यांना कामोळे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने आयआरबीच्या क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.