अलिबाग तालुक्यात उभ्या चारचाकींचे टायर, बॅटरींची चोरी

पोयनाड पोलिस ठाणे हद्दीत चार घटना
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरात वेगवगेळ्या चार ठिकाणी अज्ञात चोरटयाने पार्किंग करुन ठेवलेल्या चारचाकी वाहनांचे टायर, बॅटरी अशा साहित्य काढुन नेण्याच्या घटना घडल्या आहेत. चार वेगवेगळ्या घटनांप्रकरणी पोयनाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचे वृत्त असे की, पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 11 ते दि. 12 फेब्रुवारी या दरम्यान मौजे सांबरी गावचे हददीत मुंढाणी बेणसे ता.पेण यांची स्वीप्ट डीझायर कार नं. एमएच 03 सीपी 6896 ही सांबरी गावचे हददीत पार्कींग करून रोड लगत ठेवली असता अज्ञात चोरटयाने कारचे मागील दोन जे के कंपनीचे टायर डीक्ससह खोलुन नेले. लसेच अजय एकनाथ तोरणकर यांची टाटा मॉक्झिमो गाडी नं एमएच 12 एफडी 5110 ची एक ईमार्क कंपनीची बॅटरी, उमेश गजानन भिसे टाटा जीप गाडी नं एमएच 06 बीडब्लु 2062 ची एक एक्साईड कंपनीची बॅटरी, अनिल राजु माने टाटा इंन्ट्रा गाडी एमएच 06 बीडब्लु 5480 ची एक एक्साईड कंपनीची बॅटरी सर्व राहणार नामदेवनगर पोस्ट पोयनाड असा एकुण हजारो किमतीचा माल काढुन चोरून नेला. याबाबत पोयनाड पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क.379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण हे करीत आहेत

Exit mobile version